करमाळा तालुका अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा या शाखेच्या महिला तालुकाध्यक्षपदी सुषमा गिरवलकर यांची निवड
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा या शाखेच्या महिला तालुकाध्यक्षपदी सुषमा ज्योतीराम गिरवलकर यांची निवड तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी केली आहे. सौ सुषमा ज्योतीराम गिरवलकर यांची महिला तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संतोष काका कुलकर्णी यांच्या धर्मपत्नी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या मार्गदर्शिका सौ. शामल संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते व ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य भारत घुगीकर काका व संस्थेचे कार्याध्यक्ष निलेश गंधे यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी निवड झाल्यानंतर सौ सुषमा गिरवलकर यांनी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था शाखा नाशिक यांच्या माध्यमातून ब्राह्मण समाजातील महिलांचे संघटन करून त्यांना स्वयंरोजगार व आर्थिक दृष्ट्या स्वालंबी जीवन जगण्यासाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मयुरी गंधे, वैष्णवी कुलकर्णी, मंजिरी जोशी, निकिता कुलकर्णी ,अनिता कुलकर्णी, रेखा जोशी ,सुशीला कुलकर्णी, आशा कुलकर्णी, शारदा गंधे ,दिपाली विद्वत वैशाली विद्वत,सौ मीना घुगीकर प्रियांका जोशी उपस्थित होत्या. त्यांच्या निवडीबद्दल अखिल ब्राह्मण समाजाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.


