पाच वर्षांपासून फरार मोक्कातील दोन आरोपी जेरबंद करमाळा पोलिसांची धडक कारवाई; दरोडा व बलात्कार गुन्ह्यांची कबुली
करमाळा प्रतिनिधी
मोक्का कायद्यांतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यातील गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना करमाळा पोलिसांनी शिताफीने अटक करत मोठे यश संपादन केले आहे. गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून निंभोरे परिसरात राबविण्यात आलेल्या कोंबींग ऑपरेशनमध्ये हे आरोपी उसाच्या शेतात लपून बसले असताना पोलिसांच्या ताब्यात आले.
करमाळा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर ८९७/२०२० (भा.दं.वि. कलम ३९५, ४५२, ३४ सह मोक्का कायदा कलम ३(१), ३(२)(ii), ४) या गुन्ह्यात यापूर्वी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी
कापऱ्या उर्फ कापुरशेठ कोंगाऱ्या भोसले (वय ५५) व
राजधान्या कोंगाऱ्या भोसले (वय ३८)
दोघेही रा. निंभोरे, ता. करमाळा, जि. सोलापूर हे गेल्या पाच वर्षांपासून फरार होते.
या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने नाकाबंदी, गुप्त बातमीदारांमार्फत माहिती संकलन तसेच कोंबींग ऑपरेशन राबविण्यात येत होते. अखेर दि. ११ जानेवारी २०२५ रोजी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज अभंग व गुन्हे प्रकटीकरण पथकाने निंभोरे परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
पोलीस ठाण्यात अधिक चौकशी केली असता, आरोपींनी एक दरोडा व एक बलात्काराच्या गंभीर गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार करमाळा पोलीस ठाण्यात पुढील गुन्हे दाखल करण्यात आले —
गु.र.नं. ८४८/२०२५ – भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२), ३११ (दरोडा)
(फिर्यादी : रघुनाथ शिवाजी गोमे, वय ८०, व्यवसाय – शेती, रा. साडे, ता. करमाळा)
गु.र.नं. १००८/२०२५ – भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ११९(१) (बलात्कार)
सदर कारवाई अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण), प्रितम यावलकर (अप्पर पोलीस अधीक्षक), अंजना कृष्णा (सहाय्यक पोलीस अधीक्षक, करमाळा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक रणजित माने, सपोनि मनोज अभंग, पोहेकों अजित उबाळे, पोना मनिष पवार, पोना वैभव ठेंगल, पोकों अर्जुन गोसावी, हनुमंत भराटे, रविराज गटकुळ, अमोल रंदील, अमोल पवार तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोहेकों व्यंकटेश मोरे यांच्या पथकाने केली.
पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींना अटक झाल्याने करमाळा तालुक्यात समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.


