करमाळा

संवेदनशील प्रशासनाचा अनुभव ग्रामपंचायत सालसे येथे दिव्यांगांना मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत सालसे येथे झालेल्या गाव भेट व ग्रामपंचायत तपासणीदरम्यान प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारा प्रसंग घडला.
या वेळी ग्रामपंचायत सालसेच्या स्वनिधीतून उपलब्ध असलेल्या ५ टक्के दिव्यांग कल्याण निधीमधून गावातील पात्र दिव्यांग बांधवांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम यांनी कोणताही औपचारिकतेचा आव न आणता थेट दिव्यांग लाभार्थ्यांसोबत जमिनीवर बसून आपुलकीने व सन्मानाने धनादेश सुपूर्द केले. त्यांच्या या माणुसकीपूर्ण कृतीने उपस्थितांचे लक्ष वेधले.
धनादेश स्वीकारताना दिव्यांग लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. लाभार्थ्यांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, ही मदत आपल्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी उपयोगात आणणार असल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
ग्रामपंचायत सालसे येथे घडलेला हा प्रसंग प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील नात्याला बळ देणारा ठरला असून, विकासासोबत संवेदनशीलता हीच प्रशासनाची खरी ओळख असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!