जयप्रकाश बिले कनिष्ठ महाविद्यालयाचा 100% निकाल. कु .अश्विनी कोथमिरे महाविद्यालयामध्ये प्रथम

करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या HSC बारावीचा आज निकाल जाहीर झाला. यामध्ये जयप्रकाश बिले कनिष्ठ महाविद्यालय झरे येथे मुलींनी बाजी मारून 100% निकाल लागला. यामध्ये प्रथम कु अश्विनी रामलिंग कोथमिरे(81.23%), द्वितीय कु तनुजा सचिन माने (78.92%), तृतीय कु ज्योती दादासाहेब तकीक (75.07%) यांनी क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे श्री भैरवनाथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्राचार्य जयप्रकाश बिले, सचिव श्री युवराज बिले, संचालिका डॉ स्वाती बिले, प्राचार्य युवराज सातव , विभागप्रमुख प्रा नंदकिशोर वलटे यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्रा युवराज सातव, प्रा नंदकिशोर वलटे, प्रा प्रियांका बारस्कर, प्रा अश्विनी भालेराव प्रा शशिकांत अवचर यांचे मार्गदर्शन लाभले.
