गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब वेताळ पेठ करमाळा यांच्यावतीने 30 ऑगस्ट रोजी मोफत रक्त तपासणी नेत्र मोतीबिंदू शिबिर रक्तदान शिबिराचे आयोजन -प्रशांत ढाळे
करमाळा प्रतिनिधी गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब करमाळा यांच्यावतीने गणेश उत्सवानिमित्त रक्तदान व रक्त तपासणी शिबिर तसेच नेत्र तपासणी मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी संजीवनी हॉस्पिटल वेताळपेठ करमाळा येथे करण्यात आले असल्याची माहिती गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी दिली आहे. गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक उपक्रमात सदैव अग्रेसर राहून काम करत असून यंदाच्या वर्षी करमाळ्याच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून त्यांनी यंदाच्या वर्षी मोफत रक्त तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये रक्तातील शुगर HBA1C ,KFT किडनी टेस्ट,LTF लिव्हर टेस्ट, cholesterol कोलेस्ट्रॉल, thyroid थायरॉईड लिपिड प्रोफाइल या सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. हे रक्त तपासणी शिबिर संपन्न होणार आहे. सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत रक्तदान शिबिर सकाळी 10ते 5 वाजेपर्यंत सुरू राहणार असून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे. तरी करमाळा शहरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गजानन सोशल स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने प्रशांत ढाळे केले आहे.


