डाॅ.संतोष पालखेच्या केम प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने वाचले एका इसमाचे प्राण देवदुतासारखे केले काम
केम प्रतिनिधी केम परिसरामध्ये एक अनोळखी पुरुष वय वर्ष 40 गंभीर जखमी अवस्थेत केम रेल्वे रुळावर आढळून आले असता केम प्राथमिक आरोग्य केंद्र केम येथे प्राथमिक उपचार करून 108 अंबुलन्स सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवलेले आहे डॉ संतोष पालखे आणि केम प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्यामुळे एक जीव वाचला आहे खरोखरच केम येथील डॉक्टर संतोष पालखे व केम प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून एक अनोळखी इसमाला जीवदान दिले आहे केम परिसरातील सर्व नागरिकांतून डॉक्टर व कर्मचारी यांचे कौतुक करण्यात येत आहे करमाळा तालुक्यातील सर्व डॉक्टर व शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून अशा पद्धतीचे काम जर केले तर त्या कर्मचाऱ्यांचे करमाळा तालुक्यामधील कौतुक केले जाईल.
