Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळा

करमाळा तालुक्यात संगोबा येथे सिना नदीला आलेल्या पुरात अडकून पडलेल्या शेतकऱ्यांना भोई समाज बांधवांनी दिले जीवनदान

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील संगोबा येथे अतिवृष्टीमुळे ‌सीना नदीला पूर आल्यामुळे येथील शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या वाडी वस्तीवर पाणी आल्यामुळे शेतकरी पुरता अडकले होते अशा शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्याचे काम येथील भोई समाजातील शामराव भोई,भारत भोई, साहेबराव भोई, सचिन भोई, अविनाश भोई, दादा भोई, यांनी स्वतः ची जीवाची पर्वा न प्राणाची बाजी लावून शंभर ते दिडशे लोकांचे जीव वाचवण्याचे काम केले आहे.
एकीकडे स्वतःची शेतीचे नुकसान झाले असताना आपला प्रपंच उध्वस्त झाला असतानाही ‌ माणुसकीच्या भावनेतून भोई समाजातील या समाज बांधवांनी प्राण वाचवले आहे.
संगोबा बोरगाव निलज बाळेवाडी‌ तरडगाव या बाधित क्षेत्रातील ‌ शेतकऱ्यांना ‌ खऱ्या अर्थाने ‌ नवजीवन देण्याचे काम या बांधवांनी केले असल्यामुळे प्रशासनाने तहसीलदार सौ. शिल्पाताई ठोकडे यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करावा तसेच करमाळा तालुका आपत्ती व्यवस्थापन सुरक्षा समितीत यांना घेऊन ‌ भावी काळात करमाळा अशा आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करावे अशी येथील जनतेची अपेक्षा आहे.

 

 

error: Don\'t try to copy. Content is protected !!