लोकनेते माजी राज्यमंञी स्व. दिगंबर रावजी बागल (मामा) यांची जयंती रावगाव येथे साजरी
करमाळा प्रतिनिधी रावगाव ता करमाळा येथे स्व. लोकनेते माजी सामाजीक न्याय राज्यमंञी दिगंबररावजी बागल मामा यांच्या 67 व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन माजी ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर बुधवंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्व. दिगांबररावजी मामा यांच्या कार्याचा आढावा मकाई सहकारी साखर कारखाना माजी संचालक प्रताप बरडे सर यांनी घेतला तसेच मामांच्या कार्यावर आलेल्या वर्तमानपत्रातील लेखाचे वाचन करण्यात आले
यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे लेबर ऑफीसर भाग्येश्वर बरडे,कृष्णाई दूध संघाचे चेअरमन भरत धगाटे ,गाव कामगार पोलीस पाटील बापूसाहेब पाटील, सुभाष काळे पाटील, संजय मोडके,राजेंद्र पाटील,हनूमंत खाडे, दत्तात्रय शिंदे, हनूमंत पवार, ज्ञानेश्वर पवार, रवींद्र मोडके,आदि उपस्थित होते .प्रस्ताविक भाग्येश्वर बरडे, तर आभार भास्कर पवार यांनी मानले.
