यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात स्व. दिगंबररावजी बागल जयंती साजरी*
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे लोकनेते स्व दिगंबरराव बागल मामा यांची जयंती साजरी करण्यात आली .स्व . दिगंबररावजी बागल यांच्या प्रतिमेला मा . विलासरावजी घुमरे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. लक्ष्मण राख यांनी आपले मनोगतातून स्व. मामांच्या कार्याची माहिती दिली यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव मा. विलासरावजी घुमरे सर , विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील , वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल सांळुखे , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजीराव किर्दाक , मा. कलिम काझी , प्रबंधक श्री.कैलास देशमुख, ग्रंथपाल डॉ.रामटेके , मा. प्रकाश झिंजाडे आदिनाथ साखर कारखान्यांचे संचालक व यशवंत परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
