उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांच्या जागरण गोंधळ कार्यक्रमास जमला गुणवंताचा मेळा
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील राजुरी गावची उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांच्या जागरण गोंधळ आजच्या कार्यक्रमाला अठरा पगड जातीचे लोक उपस्थित होते माणसाने माणसाशी माणसासारखी वागावे याचा प्रत्यय त्यांच्या या कार्यक्रमात दिसून आला विशेष म्हणजे करमाळा तालुक्याचे किंग मेकर मार्गदर्शक विलासराव घुमरे सर उप प्राचार्य संभाजी कीर्दाक दत्तकलाचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर श्रीकांत कांबळेसर गणेश वळेकर पंचायत समितीचे सभापती अतुल भाऊ पाटील सरपंच डाॅ अमोल दुंरदे. युवा नेते आर आर बापू साखरे पाटील नवनाथ दुंरदे,माजी सरपंच गणेश जाधव संजय सारंगकर नागेश मोरे माऊली चिंचकर ,लक्ष्मण शिंदे बंडु गुरूजी राजेंद्र भोसले मेजर हनुमंत जगताप, भारत मुक्ती मोर्चा बामसेफ अध्यक्ष आर आर पाटील,उद्योजक हनुमंत शिंदे, पत्रकार दिनेश मडके मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष किसन कांबळे भाजपाचे दीपक चव्हाण पत्रकार नरेंद्रसिंह ठाकुर सिध्दार्थ वाघमारे, सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे आबासाहेब टापरे श्रीकांत साखरे,सुहास काळे पाटील, बापू डास ब्राह्मण सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते राजुरी गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते विविध पक्षाची जातीची माणसे जागरण गोंधळ कार्यक्रमाला उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. खऱ्या अर्थाने विचार केला तर माणसाने जर आपुलकीची भावना ठेवून माणुसकीचे नाते तयार केल्यानंतर रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते श्रेष्ठ होते ही संतोष काका कुलकर्णी यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्ये असल्याचे दिसून येते खऱ्या अर्थाने सोशल इंजिनिअरिंगचे उत्तम उदाहरण यामुळे पाहायला मिळाले मानवता हाच खरा धर्म हेच या जागरणाचे खऱ्या फलित म्हणावे लागणार आहे.
