करमाळा

सावंत बंधूंच्या शाही विवाह सोहळयात माही डेकोरेशनच्या मंगेश गोडसे व त्याच्या सहकाऱ्यांनी साकारली सोन्याची लंका..

करमाळा प्रतिनिधी”सावंत बंधूंच्या शाही विवाह सोहळयात माही डेकोरेशनच्या मंगेश गोडसे व त्याच्या सहकाऱ्यांनी सोन्याची लंका.दादासाहेब सावंत यांचे लाडके चिरंजीव गणेश यांचे लग्नाचे मंडप व डेकोरेशन ची जबाबदारी दादासाहेब नी सुनिल बापु सावंत यांच्यावर सोपवण्यात आली त्या मार्गदर्शनाखाली माही डेकोरेशनच्या मंगेश गोडसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आता परिश्रम घेऊन डोळ्यांना दिपवणारे शाही विवाह सोहळा संपन्न करण्यासाठी आपल्या कौशल्याचा वापर करून वाहवा मिळवली.

डेकोरेशन देखणं होण्यासाठी लावलेलं तगडं नियोजन..अर्थातच लग्नही तगडंच. ‘क्षण’ हे एकदाच येत असतात. वेळ आपल्या हातात असते. मग त्याला संस्मरणीय करण्यासाठी आपली धडपड चाललेली असते. पण ती शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध असावी लागते.
लग्न हे एकदाच होत असतं आणि आपण केलेलं काम त्या दिवशी त्यांच्या कॅमेरात कायमचं बंद होत असतं..! 20 वर्षांनंतर जरी कधी अल्बम उघडला तरी तेव्हाही ते वर्तमानातल्या प्रमाणे ‘मॉडर्न’ वाटलं पाहिजे. आणि ते तसं वाटण्यासाठी काम करणाऱ्या कारागिराच्या रक्तात ‘फिनिशिंग’ लागते. तेव्हा जाऊन समोरचा आपलं काम बघून निशब्द होतो.
कालच्या या लग्नाला आमदार सुरेश धस व आमदार संजय मामा शिंदे व रणजितसिंह मोहिते पाटील, उपस्थित होते. लग्नमंडपात आल्यानंतर स्टेजवर बोलताना पॅलेस पाहून त्यांच्या तोंडून शब्द निघाले..”सोन्याची लंका उभी झाली इथं…!!” आणि इव्हेंट जोरदार झालाय हे पण शिक्कामोर्तब करून टाकलं.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group