Tuesday, September 29, 2026
Latest:
Uncategorized

सोगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी माजी आमदार शिंदे गटाच्या सरडे यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी
सोगांव ग्रामपंचायत च्या उप- सरपंच पदी करमाळा विधानसभा मा.आमदार श्री संजय (मामा) शिंदे गटाच्या सौ. शारदा आप्पासाहेब सरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी सोगांव ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच श्री विशाल विश्वनाथ सरडे, सोगांव ग्रामपंचायत अधिकारी/ग्रामसेवक श्री गणेश पवळ, नूतन उपसरपंच सौ.शारदा आप्पासाहेब सरडे, ग्रामपंचायत सदस्या सौ. बायडाबाई निकत, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रविण उत्तम सरडे, ग्रामपंचायत सदस्या सौ.कोमल विकास भोसले, ग्रामपंचायत सदस्या सौ दिपाली नागेश पवार,श्री दादासाहेब गोडगे, श्री आप्पासाहेब सरडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री रविंद्र (आण्णा) गोडगे, माजी उप सरपंच श्री तानाजी राखुंडे, श्री गौरव बापू सरडे,श्री शिवाजी सरडे साहेब,मा. उपसरपंच श्री हरिश्चंद्र संभाजी भोसले, श्री बलभीम आबा गोडगे, श्री तुळशीदास गोडगे, श्री रेवणनाथ गोडगे, श्री तानाजी सरडे,श्री शिवाजी राखुंडे, श्री प्रविण सरडे, श्री तानाजी गोडगे, श्री केरा गोडगे, श्री केरबा निकत, श्री जोतीराम गोडगे, श्री बाळासाहेब महादेव सरडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोगांव पुर्व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री बाळासाहेब विठ्ठल सरडे, श्री सोमनाथ सरडे, श्री बालाजी भिसे, श्री बाळू गोडगे, श्री अतुल सरडे, श्री राहुल सरडे,श्री लक्ष्मण मारुती गोडगे, श्री शंकर नांगरे,श्री उत्तरेश्वर भोसले,श्री ब्रम्हदेव सरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!