कामगार नेते हमाल पंचायतचे अध्यक्ष स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी कामगार नेते व हमाल पंचायतचे संस्थापक अध्यक्ष माजी जिल्हा परिषदचे माजी सदस्य स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून त्यानंतर श्रद्धांजलीपर कार्यक्रम होणार आहे. जयंतीनिमित्त मूकबधिर शाळा येथे विद्यार्थ्यांना मिष्ठान भोजन व कुटीर रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप नगररोड येथील गौशाळेत चारा वाटप करण्यात येणार आहे तरी या जयंती कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करमाळा तालुका हमाल पंचायतच्यावतीने करण्यात आले आहे.
