आदिनाथ सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आर्थिक अडसर दुर करण्यासाठी बचाव समितीचे प्रमुख हरीदास डांगे यांनी २० नोव्हेंबरला बोलवली बैठक
करमाळा प्रतिनिधी शेतकरी सभासद यांची गरज लक्षात घेऊन यंदा कसल्याही परिस्थितीत आदिनाथ कारखाना चालू करायचा आदिनाथ स.सा.कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात आल्यानंतर, गेले तीन-चार महिने तो सुरू करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. मध्यंतरी काही उत्साही मंडळींकडून एक-दोन वेळा कारखाना सुरू होण्याच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या. त्या अनुषंगाने कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने नेमकी तयारी कुठपर्यंत आली आहे. याची मिमांसा सर्वांनाच माहीत व्हावी. या दृष्टीने संचालक मंडळ, राजकीय नेते आणि कारखाना सभासद यांची महत्त्वाची बैठक कारखाना स्थळावर, उद्या रविवार दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांनी दिली आहे. पुढे बोलताना हरिदास डांगे यांनी सांगितले आहे की, कारखाना सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात काम आलेले आहे. कारखाना सुरू होणार आहेच, परंतु काही आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी कारखान्याच्या सभासदांनी शेअर्स पूर्ण करण्याची गरज आहे. सभासदांनी हे लक्षात घेतले, तर या हंगामात कारखाना नक्कीच सुरू होईल, अशी हमी डांगे यांनी दिली आहे.या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शेतकऱ्यांसह संचालक मंडळ, राजकीय नेते मंडळी आणि सभासद या सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डांगे यांनी केले आहे. त्यामुळे आता हरिदास डांगे यांनी बोलावलेल्या या बैठकीकडे तालुक्यासह परिसरातील राजकारणी, ऊस उत्पादक आणि सामान्य शेतकरी सभासद यांचे लक्ष लागलेले आहे.