सावडी विविध कार्यकारी सोसायटीवर भैरवनाथ विकास पॅनलचा विजय होणार- प्रतापराव जगताप
करमाळा प्रतिनिधी सावडी विविध कार्यकारी सोसायटीवर ग्रामस्थांच्या पाठबळावर भैरवनाथ विकास पॅनल विजयी होणार असल्याचे मत करमाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी व्यक्त केले. सावडी ता.करमाळा विविध विकास कार्यकारी सेवा. सोसायटीचा भैरवनाथ विकास पॕनच्या प्रचाराचा शुभारंभावेळी करमाळा तालुका काॕग्रेस आयचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप उपस्थित राहुन सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन बाळासाहेब पांढरे हे उपस्थित होते.सावडी येथील गत 30 वर्षापासुनची सत्ता यावेळी उलथुन टाकण्याचा विडा सर्व ग्रामस्थांनी उचलला असल्याचे चित्र येथील बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीवरुन दिसुन येत होते.
