केत्तुरच्या नेताजी सुभाष विद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांनी शाळेत केले वृक्षारोपण
केत्तूर ता.6 देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त व शिक्षक दिनाचे औचित्य साधून नेताजी सुभाष विद्यालय (केत्तूर- न.2,ता.करमाळा) या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी आवश्यक असणारी झाडे भेट देत वृक्षारोपण केले,या उपक्रमाचे प्राचार्य डी.ए.मुलांणी यांनी कौतुक केले.
यावेळी ओंकार खाडे या विद्यार्थ्यांने मनोगत व्यक्त केले “फक्त भारतालाच नव्हे तर जगाच्या दृष्टीने पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे, शिवाय झाडे शाळेची शोभा वाढवण्याबरोबर पर्यावरणाचे रक्षण ही करतात”असे त्यांने आपले मत व्यक्त केले.वृक्षारोपण कार्यक्रमासाठी ओंकार खाडे,महावीर पाटील,करण निकम, तुषार तावरे,सौरभ कनिचे, स्वप्निल बाबर,यांनी सहकार्य केले.यावेळी शाळेच्या वतीने या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.डी. मध्ये यांनी केले तर व्ही.एच.कडवे यांनी आभार मानले.
