करमाळाशैक्षणिकसकारात्मक

दत्तकला टॅलेंट सर्च परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा संप्पन

केतुर प्रतिनिधी
दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला आयडियल स्कुल अॅन्ड ज्युनियर कॉलेज केतुर-१ मध्ये दि.१०/०४/२०२२ रोजी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा रामदासजी झोळ यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तकला टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा बक्षिस वितरण सोहळा शिक्षक दिनानिमित्त दि.०५/०९/२०२२ रोजी आनंदाने पार पडला. या कार्यक्रमासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदासजी झोळ सर व संस्थेच्या सचिव सौ. माया झोळ मॅडम व संस्थेचे प्रशासकिय अधिकारी डॉ. विशाल बाबर, तसेच दत्तकला आयडियल स्कुल अँड ज्यु. कॉलेजचे प्राचार्य श्री विजय मारकड सर या प्रसंगी उपस्थित होते. तसेच सदरच्या
कार्यक्रमासाठी परिसरातील जि. प. शाळा व विद्यालयातील शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.झोळ सरांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व त्याचे फायदे , तसेच शालेय जिवनामध्ये स्पर्धा परिक्षेचे महत्व कश्या प्रकारे आहे याविषयी विद्यार्थ्याना महत्व पटवून दिले.

सदर दत्तकला टॅलेंट सर्च परिक्षेसाठी पहिली ते बारावी या वर्गातील १५४६ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला होता. विजेत्या विद्यार्थ्यांपैकी प्रथम क्रमांकासाठी ३००१ द्वीतीय क्रमांकासाठी २००१ व तृतीय क्रमांकासाठी १००१ पारितोषिक असे एकुण ७८०४० रुपये असे बक्षिसाचे स्वरूप होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group