करमाळ्यात रामनवमीचा जल्लोष रामनवमीदिवशी कारसेवकांच्या हस्ते होणार महाआरती
करमाळा प्रतिनिधी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराचे बांधकाम सुरू असून जानेवारी 2024 मध्ये श्रीराम मंदिराचे उद्घाटन होत आहे.अखंड भारतात श्रीराम मंदिर कधी पूर्ण होणार याची उत्सुकता लागली आहे.त्यातच या वर्षी देशात श्रीरामनवमी उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. श्रीराम मंदिर उभारणीच्या लढ्यात लाखो कारसेवक सहभागी झाले होते.
30 मार्च रोजी श्रीरामनवमी उत्सव समिती वतीने शहरातील मुख्य सुभाष चौक येथे होणारी श्रीराम महाआरती कारसेवकांच्या सन्मानार्थ शहरातील कारसेवकांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे उत्सव समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
तरी या महाआरती साठी जास्तीत जास्त श्रीराम भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन उत्सव समिती वतीने करण्यात आले आहे.
