करमाळा येथील सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी मोहम्मद खान यांचे निधन
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी हाजी मोहम्मद महेबूब खान पठाण उर्फ खान चाचा वय 95 यांचे राहत्या घरी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी चार मुले, दोन मुली, सुना नातवंडे पणतु असा मोठा परिवार आहे ते खान चाचा नावाने प्रसिद्ध होते.
करमाळा येथील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक खान सर तसेच नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी जब्बार खान यांचे ते वडील होते.त्यांच्यावर करमाळा येथील कब्रस्तान मध्ये मुस्लिम रीती रिवाजा नुसार अंत्यविधी करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच निकटवर्ती नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते


