जनता भाजपाला येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवणार- प्रतापराव जगताप अध्यक्ष काॅंग्रेस ॲाय
करमाळा प्रतिनिधी सध्या ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये सरकारी संस्थाचा दुरुपयोग करून तसेच पैशाची प्रलोभने दाखवून विरोधी पक्षाची सरकारे पाडली जात आहेत हे सर्व आपल्या देशाच्या लोकशाही साठी घातक आहे. तसेच या सर्व घडामोडींवर देशातील जनता लक्ष ठेवून आहे येणाऱ्या काळात जनता भाजपाला निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवला शिवाय राहणार नाही असे प्रतिपादन करमाळा काँग्रेस आय चे अध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केले. यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की जर का देशाला वाचवायचे असेल तर लोकांपुढे काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे. राष्ट्रीय पातळीवर भाजपला टक्कर फक्त काँग्रेस हाच पक्ष देऊ शकतो.तसेच आपला पक्ष सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारा आणि सर्वांना न्याय देणारा पक्ष आहे. शेवटी बोलताना ते म्हणाले की गाव तेथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता हे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवून पुढील वाटचाल आपण करणार आहोत. यावेळी शेलगाव (क) शाखेच्या उद्घघाटनाचा नारळ सुभाष पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी प्रतापराव जगताप यांचा सत्कार सुजित शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच अल्पसंख्याक विभाग चे जिल्हा उपाध्यक्ष दस्तगीर पठाण, तालुका अध्यक्ष जावेद शेख आदी जणाचा सत्कार येथे करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी सुजय जगताप, सचिन कटारिया, योगेश राखुंडे, गणेश फलफले, गितेश लोकरे, शरद शिंदे, प्रदीप बनसोडे, विठ्ठल शिंदे, तात्याराम बनसोडे, वैभव शिंडे तसेच सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नितीन चोपडे यांनी केले. तद्नंतर धर्मराज शिंदे यांच्या निवास्थानी बैठक घेऊन चहापाण्याचा कार्यक्रम झाला.
