Sunday, April 20, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

घरोघरी राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यासाठी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी
भारत देशाच्या स्वातंत्र्याल्या 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पूर्ण होत आहे या पार्श्वभूमीवर करमाळा शहर व तालुक्यात दिनांक 13 ऑगस्ट ते दिनांक 15 ऑगस्ट या दरम्यान शासनाचा ” हर घर तिरंगा “हा विशेष उपक्रम राबविला जाणार आहे यामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन प्रत्येकांनी आपल्या घराच्या इमारती वर दुकानावर तिरंगा झेंडा लावुन सहभाग घ्यावा असे आवाहन भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा यांनी केले आहे .
की तमाम भारत वासीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्यांच्या स्मृती तेवत राहव्यात देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या शहीद .क्रांतीकारकव अज्ञात नायकांचे व स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे आपल्या देश भक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी आपल्या देशाप्रती भक्ती सह कृतज्ञतेची जाणीव वृद्धींगत व्हावी हाच हया मागचा उद्देश आहे त्या मुळे तमाम नागरिकांनी आप आपल्या घराच्या इमारती वर दुकानावर “” हर घर झेंडा “” हा शासनाने दिलेला उपक्रम राबविण्यासाठी राष्ट्रध्वजाची उभारणी करून या उपक्रमात सहभागी व्हावे तसेच ज्या ठिकाणी ध्वज लावण्यात येणार आहे अश्या प्रत्येक ठिकाणी काळजीपूर्वक त्याची प्रतिष्ठा राखुन तो स्पष्ट पणे दिसेल अश्या रितीने लावण्यात यावा तसेच महाराष्ट्र शासनाकडून व जिल्हा प्रशासना कडुन ज्या मार्गदर्शक सूचना प्रसारित होईल त्या सर्व नियमांचे शंभर टक्के पालन करून राष्ट्रध्वजाची उभारणी करावी असे आवाहन यांनी केले आहे.हर घर झेंडा या उपक्रमासाठी करमाळा तालुक्याचे तहसीलदार मा. संमीर माने व करमाळा पोलीस स्टेशन चे निरीक्षक मा. सुर्यकांत कोकणे साहेब , करमाळा नगरपालिका चे मुख्याधिकारी बालाजी लोंढे साहेब व जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक मा. नरसिं जी चिवटे साहेब यांच्या शुभहस्ते भारतीय तिरंगा ध्वजा चे वाटप होणार आहे व हाजी अल्ताफशेठ तांबोळी नगरसेवक, हाजी कलीम काझी सर, माजी नगराध्यक्ष श्री युसुफ नालबंद, ॲड बाबुरावजी हिरडे साहेब,संजय सावंत नगरसेवक, राहुल सावंत पंचायत समिती सदस्य, दिपक चव्हाण भाजपा सचिव महाराष्ट्र,फारुक भाई जमादार, हाजी लालुमिया शेख गुरुजी, जामा मस्जिद चे विश्वत सय्यद भाई पत्रकार, माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी,शौकत नालबंद माजी नगराध्यक्ष,हाजी फारुख बेग मुस्लिम विकास परिषद, शिवसेनेचे संजय शिंदे, नागेश कांबळे आर.पी.आय. पश्चिम महाराष्ट्र,लक्ष्मण भोसले दलित सेना, दिपक ओहोळ माजी नगराध्यक्ष,संजय घोरपडे,हाजी सादिक काझी मंडल अधिकारी, युसुफ बागवान सर्कल करमाळा तहसील, समीर पटेल, युसुफ शेख सर, मुख्तार काझी सर, सुरज शेख भाजपा अल्पसंख्याक विभाग, युवा नेते अमीर शेठ तांबोळी , ॲड नईम काझी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अशपाक जमादार, आझाद शेख,काॅंग्रेसचे दस्तगीर पठाण,इसाक पठाण बहुजन विकास संस्था,कय्युम शेख मुस्लिम क्रांती मोर्चा,सिकंदर फकीर,सर्व मशिदी चे मौलाना,विजय देशपांडे, श्री भुजबळ गुरुजी , अंबादास माळी,.श्री कुंभार सर, खलील मुलाणी,आयशा मस्जिद चे विश्वत हाजी आसिफ शेख, उद्योजक जब्बार शेठ बेग, बाबासाहेब शेख ड्रायव्हर, कबीर भाऊसाहेब, रफिक शेख निवृत आरोग्य निरीक्षक, सर्व पत्रकार बंधु ,व मुस्लिम समाज चे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत दिनांक 10/08/2022 रोजी सायंकाळी 05/00 वाजता मोहल्ला गल्ली करमाळा येथे पार पडणार आहे तरी सर्व नागरिकांनी हर घर झेंडा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group