33 वर्षाच्या प्रदीर्घ प्रामाणिक सेवेनंतर करमाळा एस् टी आगाराचे वाहक श्री संजय हांडे सेवानिवृत्त
करमाळा प्रतिनिधी
श्री हांडे हे 16/04/1989 ला करमाळा आगार एसटी डेपो मध्ये वाहक या पदावरती नियुक्त झाले, यानंतर त्यांनी 33 वर्षे एसटीमध्ये निष्कलंक नोकरी केली ,त्यांनी एसटीमध्ये ड्युटी करत असताना विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले एसटी मध्ये प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी 2000 ते 2003 तब्ब्ल् 3 वर्ष त्यांनी करमाळा आगारामध्ये व्हिडिओ सेवा बस सुरुवात केली ,या सेवेचा प्रवाशांनी प्रचंड लाभ घेतला, त्यामुळे एसटीच्या प्रवाशामध्ये सातत्याने वाढ होत गेली 33 वर्षाच्या सेवे मध्ये आज पर्यंत कधीही चिरीमिरी साठी त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली नाही, अतिशय शिस्तबद्ध व इमानदारने त्यांनी एसटीमध्ये वाहक या पदावर काम केले, त्याचबरोबर ग्राहक मंच व अंधश्रद्धा निर्मूलन समिती यामध्ये ते गेले 27 वर्षापासून काम करत आहेत, करमाळा एसटी आगारातील बरेचसे चालक वाहक सह कर्मचाऱ्यांना त्यांनी व्यसनमुक्तीचे धडे दिले,पूर्वीपासून सुपारीचे खांड हि न खाणारे असे श्री हंडे आजही निर्व्यसनी आहेत ,त्यांचे घरी आज सुद्धा चहा केला जात नाही, घरामध्ये येणारा मित्रपरिवार किंवा पाहुण्यांना चहा ऐवजी शरबत दिला जातो, त्यांच्या म्हनन्यानुसार चहा सुद्धा एक व्यसनच आहे, कित्येक चालक वाहकांची त्यांनी तंबाखू या घातक व्यसनापासून मुक्ती केली, गेले ते 33 वर्षे निस्वार्थी निष्कलंक आणि प्रामाणिक सेवा करणारे असे हांडे कंडक्टर करमाळा डेपो मध्ये विशेष सर्वांच्याच ओळखीत आहेत व आजही त्यांची तेवढी स्वच्छ प्रतिमा आहे, रिटायरमेंट नंतर ते सामाजिक कार्यामध्ये जसे पूर्वी सक्रिय होते त्यापेक्षा अधिक सक्रिय होऊन समाजातील भरकटत चाललेल्या नवीन पिढीला तरुणाईला ते व्यसनमुक्तीचे धडे देणार आहेत, व व्यसनमुक्त करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत,
