उद्योजक बाळासाहेब होसिंग यांचे कार्य युवापिढीसाठी प्रेरणादायी- दिनेश मडके
करमाळा प्रतिनिधी बाळासाहेब होसिंग यांनी उद्योग व्यवसाय सांभाळून सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवा करत कोरोना काळामध्ये मंगल कार्यालय उपलब्ध करुन देऊन नागरिकांची निस्वार्थ सेवा करण्याचे महान कार्य केले असून बाळासाहेबाचे होसिंग यांचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत डिजीटल मिडिया पत्रकार संपादक संघटना करमाळा तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी व्यक्त केले. बाळासाहेब होसिंग यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कारप्रसंगी बोलताना व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की भाजप उद्योजक आघाडीच्या माध्यमातुन युवक उद्योजक घडविण्याचे काम करण्याचे काम त्यांनी करावे ब्राम्हण समाज सेवा संघाच्या माध्यमातुन समाजसेवा करण्याचा त्यांचा कार्याचा वसा या पुढे जपुन समाजसेवा करावी त्यांचा भविष्यकाळ उज्वल असुन भावी वाटचालीस सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.यावेळी अखिल भारतीय ब्राम्हण संघाच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांच्यावतीने व माही डेकोरेशनचे मालक मंगेश गोडसे यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र सुर्यपुजारी,श्रीनिवास पुराणिक,मनोज कुलकर्णी, रवींद्र विद्वत, निलेश गंधे,सारंग पुराणिक,सुनील देशमुख,सागर पुराणिक,सौरभ शास्त्री,सागर कुलकर्णी,आदिनाथ खुटाळे महेश वैद्य यांच्यासह श्रीदेवीचामाळ ब्राम्हण संघाचे कार्यकर्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
