आरोग्यकरमाळाकृषी

करमाळा तालुक्यासाठी नुकसान भरपाई म्हणून 48 कोटी 60 लाखाची मागणी लवकरच निधी येणार- आमदार संजयमामा शिंदे


करमाळा प्रतिनिधी
ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे करमाळा तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. या पावसामुळे जिरायती , बागायती क्षेत्रांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. सदर नुकसानीचे पंचनामे 1 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण केलेले असून सदर नुकसान भरपाई पोटी 48 कोटी 60 लाख रुपयांची मागणी शासनाकडे केलेली असून सदर निधी लवकरच मंजूर होऊन तो संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग होईल अशी माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, 15 253 हेक्टर जीरायती क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले असून या क्षेत्रावरील 21 475 खातेदारांच्या नुकसानीचे पंचनामे केलेले आहेत त्यांना जिरायत क्षेत्राप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल .83 09 हेक्टर बागायती क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झालेले होते या बागायती क्षेत्रातील 11842 खातेदारांना बागायती क्षेत्राचा नुकसान भरपाई मोबदला दिला जाईल. तसेच 1505 हेक्टर फळबागा खालील क्षेत्र बाधित होते त्यांच्या 2002 खातेदारांना नुकसान भरपाई चा मोबदला मिळणार आहे.
तालुक्यातील एकूण 35319 खातेदारांचे 25068 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले होते .सदर नुकसानीपोटी 48 कोटी 60 लाख रुपये निधी येणार असल्याचेही त्यांनी यावेळेस सांगितले.
चौकट –
लंम्पी आजाराने मृत जनावरांच्या नुकसान भरपाई पोटी 19 लाख 50 हजार निधी मिळणार…
ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी बरोबरच जनावरांना होणाऱ्या लंम्पी आजाराने तालुक्यामध्ये थैमान घातलेले आहे. या आजाराने आत्तापर्यंत 80 जनावरांचा मृत्यू झालेला असून या प्रत्येक जनावरांसाठी 30 हजार याप्रमाणे 80 जनावरांसाठी 19 लाख 50 हजार निधी मिळणार असल्याचेही आमदार शिंदे यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group