चांगल्या विचाराच्या लोकांनी एकत्र येवुन उपेक्षित समाजासाठी तसेच विद्यार्थांसाठी प्रेरणादायी काम सुरु करु-रामहरी भोसले उपजिल्हाधिकारी
रामवाडी प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रामधील चांगल्या विचाराच्या लोकांनी एकत्र येवुन उपेक्षित समाजासाठी तसेच विद्यार्थांसाठी प्रेरणादायी काम सुरु करु असा आत्मविश्वास सातारा येथील उपजिल्हाधिकारी रामहरी भोसले यांनी व्यक्त केला. रामवाडी येथील करमाळाकरांचा स्नेहमेळावा या कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेळाव्याचे संयोजक प्रशासन आधिकारी राजेंद्र वारगड यांनी केले.
तालुक्यातील शेती,प्रशासन,अर्थ,सामाजिक ,
सांस्कृतिक ,व्यापार ,उपयोग ,क्षेत्रामध्ये आपल्या
कामाचा ठसा उमटविलेल्या गुणवंत
करमाळकरांच्या स्नेहमेळाव्यासाठी सहायुक्त नगरपालिका प्रशासन लातूर रामदास कोकरे, प्राध्यापक रामदास खाटमोडे, सहाय्यक आयुक्त जीएसटी मुंबई संतोष लोंढे ,सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री.यादव,ग्रामविकास अधिकारी अशोक फुके, टेकमहेंद्राचे संतोष रणदिवे, अतुल भोसले, डॉ. मयूर नवले , दत्तात्रय पवार, अर्जुन पिंपरे,डाॕ.दादासाहेब नवले, प्रमोद बदे,नितीन आढाव,दत्तात्रय वारगड,गिरीधर यादव,विकास खंडागळे, पुजा गुंजाळ,बबन वारगड,पांडुरंग वारगड, आतुल घोगरे,दत्तात्रय पवार,दादासाहेब मोरे,सुजितकुमार झोंड, रामहरी झांजुर्णे,सुनिल भांडवलकर,शंकर गुंजाळ,आनंद रणदिवे, संतोष वारगड,तुकाराम वारगड,गोरख पोटे, आप्पासाहेब जाधव,सुरेश भोसले,ज्ञानदेव जाधव,ज्ञानेश्वर वारगड,संतोष केसकर इत्यादीमान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सुनिल भांडवलकर यांनी व्यक्त केले.याशिवाय मेळाव्याला उपस्थित राहता न आल्याबद्दल उपाभियंता मधु सुर्वे सहायक पोलीस निरीक्षक देवडीकर, डेप्युटी डायरेक्टर कृषी बिनवडे, उद्योजक सचिन शहा इत्यादी मान्यवरांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा पाठवल्या आहेत
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…
अमेरिकेतील हार्वड विद्यापीठाच्या अस्पायर लीडर प्रोग्रॅममध्ये भगतवाडीतील कृषी कन्या पूजा शंकर गुंजाळ हिची निवड झाल्यामुळे पुजा गुजाळ हिचा यावेळी सत्कार करण्यात आला.
घरची परिस्थिती आतिशय नाजुक आसतानदेखील मला माझ्या आई वडिलांनी शिकवले.त्यांच्या विश्वासाला पात्र राहुन मी जिद्दीच्या जोरावर स्वतःहाचे आस्तित्व निर्माण केले.असे पुजा गुंजाळणे बोलताना सांगितले .
यावेळी कार्यक्रमाचे संयोजक राजेंद्र वारगड यांची जेष्ठ कन्या वैष्णवी वारगड हिचा तिच्या आजीचे हुबेहूब चित्र काढल्याबद्दल गौरव करण्यात आला. ती एमआयटी पुणे येथे फायनल आर्टच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.
