करमाळा

करमाळा शहरातील मेन रोड वरील रस्ते डांबरीकरणास आमदार फंडातून मंजुरी

करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरातील पंजाब वस्ताद चौक ते पोथरे नाका या मुख्य मेनरोड वरील रस्त्याच्या डांबरीकरणास आमदार नारायण पाटील यांच्या आमदार फंडातून मंजुरी मिळाली आहे .
करमाळा शहरातील नागरिकांनी सदर मेनरोडच्या रस्त्याच्या डांबरीकरणाची माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याकडे मागणी केली होती . त्यास अनुसरून माजी आमदार जगताप यांनी आमदार नारायण पाटील यांचे सहकार्याने सदरचे काम मार्गी लावले आहे . माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरण व कॉंक्रिटीकरणा सोबतच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी भुयारी गटार योजना व पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी अमृत -2 योजनेच्या मंजुरीच्या दृष्टीने देखील पाठपुरावा सुरू आहे .

प्रतिक्रीया
“माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे शब्दावर विश्वास ठेवून शहरवासीयांनी मला मतरूपी आशीर्वाद दिला. त्यास पात्र राहून माजी आमदार जगताप शहर विकासाच्या दृष्टीने सांगतील ती कामे करण्यास मी कटिबद्ध आहे. करमाळा शहरातील समस्या सोडवण्यासाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आग्रह आणि निधी मंजूर करून घेतला आहे .                          आमदार नारायण पाटील,करमाळा

error: Don\'t try to copy. Content is protected !!