सर्व ऊस पुरवठा वाहनांनी रिफलेक्टर बसविणे गरजेचे-रस्त्याचे कडेला वहाने लावुन होणारे अपघात यामुळे होणार नाहीत याची दक्षता घ्या- ॲड. अजित विघ्ने

करमाळा(वार्ताहर)- कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम आता चालु झालेला असुन, या चालणाऱ्या हंगामामधे ऊस वहातुक करणारी वहाने, ट्रक, ट्रक्टर रस्त्यावर बाजुला लावलेले असतात. त्याला रिफ्लेक्टर नसल्यामुळे गेल्या काही वर्षात अनेकांना अपघाता मधे आपले जीव गमवावे लागले आहेत. या करीता सर्वांनी दक्षता घेऊन आपआपल्या वहानांना रिफलेक्टर बसवुन घेणे गरजेचे आहे. या बाबतीत पोलिस प्रशासनाला देखिल आवाहन करण्याबाबत सांगितलेले असुन, सर्व वाहन धारक मित्रांनी स्वतःचे वहानाची आणि सर्वसामान्य प्रवाशांची काळजी घेण्यासाठी रिफ्लेक्टर लावावेत व सहकार्य करावे असे आवाहन पश्चिम भागातील युवक मित्र ॲड. अजित विघ्ने यांनी केलेले आहे.


