दत्तपेठ येथील रहिवाशी विलास जाधव गुरूजी यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी. दत्तपेठ येथील रहिवाशी विलास जाधव (गुरुजी). (वय – 70 ) यांचे 22 ऑगस्टला सकाळी 10.20 वाजता निधन झाले आहे.
त्यांचे पश्चात पत्नी ,3 मुले, 2 सुना आणि 4 नातवंडे असा परिवार आहे ते करमाळा तालुका शिक्षक सोसायटीचे सलग 15 वर्ष चेअरमन आणि जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र शिक्षक संघाचे जेष्ठ सल्लागार म्हणून काम पाहिले आहे तसेच सेवा निवृत्तीनंतर त्यानी शिक्षकांच्या सेवेस खंड पडू न देता ते सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
