वाशिंबे येथील भैरवनाथ मंदिर परिसरात प्रा.रामदास झोळ यांच्यावतीने वृक्षारोपण

करमाळा प्रतिनिधी वाशिंबे ता . करमाळा येथील भैरवनाथ मंदिर परिसरात दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.रामदास झोळ सर यांच्या वतीने भैरवनाथ मंदिर परिसरात आंबा, नारळ,पेरू,चिकू,जाभंळ यासारख्या १०० फळझाडे लावण्यात आली. यावेळी भैरवनाथ मंदिर ट्रस्ट च्या वतीने झाडांना ठिंबक सिंचनद्वारे पाणी सोय करण्यात आली. यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळ,मा.सरपंच श्री.अनुरथ झोळ अध्यक्ष नंदकुमार साळुंखे, उपाध्यक्ष गणेश झोळ, सदस्य विलास झोळ, सुभाष झोळ, योगेश झोळ, संदिप झोळ,सुयोग झोळ रणजित शिंदे दादा सरडे हर्षवर्धन झोळ, सचिन भोईटे,पृथ्वीराज झोळ, सह गावातील युवकांनी वृक्षारोपण कार्यक्रमात परीश्रम घेतले.

