करमाळयाची कुलस्वामिनी कमलाभवानी मंदिरामध्ये तहसीलदार शिल्पाताई ठोकडे दाम्पत्याच्यावतीने विधीवत घटस्थापना
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध कमला भवानी मंदिरामध्ये सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता तहसीलदार शिल्पा ठोकडे व त्यांच्या पतीच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्या निमित्ताने श्री कमला भवानीला चंदन मळवट भरण्यात आला, निरनिराळे आभूषणे परिधान करण्यात आली, सोनेरी रंगाचा भरजरी शालू नेसवण्यात येऊन पूजा मांडण्यात आली, भवानी मातेला मानकरी फुलारी परिवाराकडून अर्पण करण्यात येणारी झेंडूच्या फुलाची मंडवळी परिधान करण्यात आली,
घटावर झेंडूची फुलाची माळ चढवण्यात आली, भवानी मातेच्या हातामध्ये तलवार व त्रिशूल देण्यात आले. आजची पूजा रोहित पुजारी यांनी मांडली. यानंतर आरती सोहळा संपन्न झाला. आरती सोहळा संपन्न झाल्यानंतर पंचायतन देवतांची घटस्थापना उभयतांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सुशील राठोड, बापूराव पुजारी, दादासाहेब पुजारी, विजय पुजारी, रत्नदीप पुजारी, रामदास सोरटे, भारत सोरटे, तुकाराम सोरटे, प्रकाश सोरटे, रंगनाथ पुराणिक, यांचे सह मानकरी अभिषेक फुलारी, बबन दिवटे, प्रमोद गायकवाड, मनोज जामदार, राजेंद्र शिंदे, पद्माकर सूर्यपुजारी, ईश्वर पवार, शितल पवार, हनुमंत पवार, लक्ष्मण हवालदार, रमेश येळवणे, शीलाताई गोमे, इंताज शेख, इत्यादी सेवेकरी उपस्थित होते. यावेळी करमाळा परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित होते.


