Saturday, April 4, 2026
Latest:
करमाळा

सत्ता येईल सत्ता जाईल; परंतु तत्त्वाशी तडजोड करू नका अटलजींच्या विचारांपासून प्रेरणा घ्या – गणेश कराड

*
करमाळा प्रतिनिधी –”सत्ता येईल, सत्ता जाईल; परंतु तत्त्वाशी तडजोड करू नका” अटलजींच्या विचारांपासून प्रेरणा घ्या असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोशल मीडिया प्रमुख भाजप नेते गणेश कराड यांनी व्यक्त केले.माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मौलाली नगर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे सोशल मीडिया प्रमुख गणेश कराड यांनी अटलजींच्या विचारांचे महत्त्व सांगितले. प्रत्येक पक्षाची विचारधारा असते, परंतु ती सोडून केवळ राजकारण करणारे पक्ष कालांतराने कमजोर होतात. अटलजींचे विचार देशासाठी प्रेरणादायक आहेत; त्यांनी कारगिल युद्धातील विजय, पोखरण चाचणी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, 1999 मध्ये मोबाईल क्रांती आणि 2000 मध्ये मुलांसाठी मोफत शिक्षण अभियान यांसारख्या अनेक क्षेत्रांत योगदान दिले.
कार्यक्रमात भारतरत्न माजी पंतप्रधान स्व .अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. डॉ. श्रीराम परदेशी यांनी जनसंघाच्या काही आठवणी सांगितल्या आणि राजाभाऊ, देवी खुशाल, छानदार काका, सूर्यपुजारी, धोंडनसिंह परदेशी, गांधी सर, आनंदराव पवार, रामलाल काका परदेशी, डी.एस. गायकवाड, हरिभाऊ शहाणे, उदावंत सोनार मामा यांच्या कार्याला उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्रसिंह ठाकुर यांनी केले, तर भाजपा राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, सोशल मीडिया प्रमुख नितीन कांबळे, पत्रकार आशपाक सय्यद आणि इतर उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!