श्री मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करमाळा
करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त मोलालीनगर येथील दर्गाशाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप भिमाई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने जनतेचे नगरसेवक जयकुमार कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जयकुमार कांबळे यांनी शाळेतील 12 विद्यार्थ्यांंचै पालकत्व स्वीकारले आहे.यावेळी शेर ए हिंदचे अध्यक्ष मैनाद्दीनभाई शेख मार्गदर्शक हाजी फारुक बेग पै समीर शेख अय्यानभाई साहील शेख पप्पु पठाण शाहरुख शेख सोहेल शेख मान्यवरांच्या उपस्थित होते. यावेळी आयेशा मदारी, मुस्कान मदारी, अल्फिया मदारी, अल्विरा मदारी, फरहान कुरेशी, अय्यान कुरेशी ,असिफ मदारी ,सुफिया मदारी, साबिया तांबोळी, सामिया मदारी ,अरमान मदारी, अब्दुल मदारी, सना मदारी ,आरसिया मदारी, या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
