संघर्षयात्री दिपक चव्हाण यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी दिनेश मडके
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यासारख्या ग्रामीण भागातून महाराष्ट्र प्रदेश सचिवपदापर्यंत मजल मारून दीपक चव्हाण यांनी खऱ्या अर्थाने संघर्षमय जीवनातून यशस्वी जीवन प्रवास केला असून करमाळयाचा आवाज महाराष्ट्रात गाजणार असुन दीपक चव्हाण यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी आहे असे मत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की डर कर नौका पार नही होती कोशिश करने वाले की कभी हार नही होती हे दीपक चव्हाण यांनी आपल्या कार्यातून सर्व करमाळाकरांना दाखवून दिले आहे . भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश सचिव संघर्षमय प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे कौटुंबिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही जिद्द चिकाटी परिश्रम यांच्या जोरावर दिपक चव्हाण यांनी हे यश मिळवले आहे.सत्य परेशान है लेकीन पराजित नहीं हे आपल्या कार्यातुन दाखवून युवकांना एक प्रकारची शिकवण दिली आहे.भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेशसचिवपदी दिपक चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अमोल पवार यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल नरेंद्रसिंह ठाकुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, नरेंद्रसिंह ठाकुर, पत्रकार, दिनेश मडके अमोल पवार, मनोज कुलकर्णी उपस्थित होते.
