Monday, April 21, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडी

करमाळयात शिवसेनेच्यावतीने कंगना राणावतचा पुतळा जाळून जाहिर निषेध.

करमाळा प्रतिनिधी. . मुबंई ही मला पाकव्याप्त काश्मीर असल्याचे वाटत आहे असे वक्तव्य केल्यानंतर या वक्तव्याचा जाहीर निषेध करत करमाळा शिवसेनेच्या वतीने कंगना राणावतचा पुतळा जाळून जाहीर निषेध  करण्यात आला.    यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल, महिला तालुका प्रमुख वर्षा चव्हाण यांच्या उपस्थितीत कंगनाच्या पुतळाचे दहन करण्यात आले. दिग्विजय बागल म्हणाले की मुबंईसाठी 106 आपल्या हुतात्मा वीरांचे योगदान आहे. याच मुबंईने तुम्हाला पैसा, प्रसिध्दी दिली. महाराष्ट्राची अस्मिता असणारे मुबंई शहर आहे. मुबंईत राहूनच जर मुबंईला पाकव्यापत काश्मीर म्हणत असाल तर तुमचे भान जागावर नाही. या वक्तव्याचा आपण जाहीर निषेध करण्यासाठी करमाळा तालुका शिवसेनेच्या वतीने कंगना राणावतचा पुतळा जाळून जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत. महाराष्ट्र राज्याचे विकसनशील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे. कोणत्याच शहरात तुम्हाला भय नाही असेच आपले महाराष्ट्र पोलीस काम करत असते. तरीही आपले भान जागेवर न ठेवता कंगना राणावत सारखी अभिनेत्री जर अशी वक्तव्ये करत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रच या विरोधात आवाज उठवेल. आम्ही सर्व सहकारी या वक्तव्याचा जाहीर निषेध याच स्वरुपात व्यक्त करीत आहोत. शिवसेना महिला तालुका आघाडीच्या प्रमुख वर्षा चव्हाण यांनी कंगना महाराष्ट्रात कोठे ही दिसली तरी महिला आघाडीने तिचे सरळ थोबाड फोडावे अशीच विनंती आपण करीत असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना संघटक संजय शिंदे, सचिन काळे, विठ्ठल बरडे, उसेन शेख, केम सेना प्रमुख आशा मोरे, राणी तळेकर, मिराताई कूर्डे, रोहिनी नागणे, रुक्मिणी पवार, सुप्रिया पोळके, नरमा शेख आदि उपस्थित होते

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group