करमाळा

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार करिता आदर्श शिक्षिका मनीषा हरिश्चंद्र पेटकर (सौ बाभळे) यांची निवड

करमाळा प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंधवडी तालुका करमाळा येथील पदवीधर शिक्षिका मनीषा हरिश्चंद्र पेठकर (सौ बाभळे) यांची महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महिला व बाल विकासाच्या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने शासनाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो दहा हजार रुपये रोख प्रमाणपत्र व आकर्षक ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.गेल्या 30 वर्षापासून मनीषा पेटकर यांनी महिला व मुलींसाठी भरीव कार्य केलेले आहे यामध्ये महिला व मुलींचे झांज पथक लेझीम पथक तयार केलेले आहे महिला मेळावा घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन महिला व मुलींचे सक्षमीकरण करण्यासाठी दरवर्षी कराटे व योगासने सूर्य नमस्कारयांचे मार्गदर्शन करणे तसेच दरवर्षी संक्रातीनिमित विधवा महिलांसाठी व इतर सर्व महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून विविध उपक्रम जसे की सॅनेटरी पॅडचे महिला व मुलींना वाटप तसेच दरवर्षी पाच हजार वृक्षांची रोपे स्वतः तयार करून वाटप करणे स्वच्छता कामगार महिलांना स्टीलच्या ताटांचे वाटप करणे ग्रामीण भागातील महिलांना स्मार्टफोन चे प्रशिक्षण देणे तसेच लघुउद्योग बचत गट यांचे मार्गदर्शन करून महिलांना शेळीपालन कुक्कुटपालन हस्तकला व्यवसाय शिवणकाम ब्युटी पार्लर अंगणवाडी सेविका होण्यासाठी मार्गदर्शन व मदत करणे शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन व योग दिनानिमित्त मातृदिन साजरा करून माता पालकांचे स्वागत करणे तसेच मासिक पाळी व्यवस्थापनाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण घेऊन ग्रामीण भागातील महिला व मुलींना मार्गदर्शन करणे पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात जास्तीत जास्त महिलांनी श्रमदान करावे यासाठी प्रोत्साहन पर भेटवस्तू चेमहिलांना वाटप करणे तसेच पारधी समाजातील मुलींची शाळेतील गळती व स्थगिती रोखण्यासाठी कपडे वाटप व शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे मुलींना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे माता पालकांचे वेळोवेळी समुपदेशन करणे असे विविध उपक्रम राबवल्यामुळे मनीषा पेटकर यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group