यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उत्तुंग यश
करमाळा. प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील एन.सी.सी. मधील कॅडेटने सोलापूर येथे झालेल्या कॅम्पमध्ये उत्तुंग यशाची भरारी मारलेली आहे .सोलापूर येथे झालेल्या CATC – 706 व 708 कॅम्पमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने उत्तुंग कामगिरी करुन विविध स्पर्धेत ट्रॉफी व मेडल मिळवून घवघवीतयश मिळवले आहे. ड्रिल कॉम्पिटीशन- मुले व मुली प्रथम,
ऑप्टिकल – मुली प्रथम व मुले द्वितीय ,
ग्रुप डान्स – द्वितीय,
सोलो डान्स – प्रथम ,
बेस्ट कॅडेट – एक ,
ऑल कॅम्प इंसेंटीव – प्रथम
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील , वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंके , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजी किर्दाक , लेफ्टनंट डॉ. विजया गायकवाड , CTO श्री. निलेश भुसारे , कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करून अभिनंदन केले .
