मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त 11 जानेवारी रोजी रक्तदान शिबिर एक हजार तीस झाडे लावण्याचा शुंभारंभ*
करमाळा प्रतिनिधी. मकाई सहकारी कारखान्याचे चेअरमन बागलगटाचे युवा नेते दिग्विजय प्रिन्स भैय्या बागल यांच्या वाढदिवसानिमित्त 11 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घघाटन तहसीलदार समीर माने बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल मकाई च चेअरमन दिग्विजय बागल मकाईचे व्हाईस चेअरमन ॲड ज्ञानदेव देवकर यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील प्राचार्य मिलिंद फंड सर यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल झाकणे रंगनाथ शिंदे, आनंद कुमार ढेरे,शशिकांत केकान, मधुकर गाडे, सतीश बापू निळ ,सरपंच दिलीप काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार असून त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता एक हजार तीस झाडे लावण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ मार्गदर्शक विलासराव घुमरे सर पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणेसाहेब आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे उद्योगपती बाळासाहेब कोळपे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे कार्याध्यक्ष अर्जुन जांभळे मकाईचे माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे यांच्या शुभहस्ते मकाई सहकारी कारखाना भिलारवाडी येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुरुंग अधिकारी नागनाथ जगताप ग्रीन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमितभाऊ जगताप कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन चिंतामणी दादा जगताप मकाईचे कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे हे उपस्थित राहणार आहे. कोरोना नियमावलीनुसार सदर कार्यक्रम करून मास्क व सोशल डिस्टेंस पालन करून संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवुन रक्तदानासारख्या महान कार्यात सहभागी व्हावे तसेच वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन मकाई सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक कर्मचारी दादाश्री फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.
