सुरताल संगीत विद्यालयाचा संगित महोत्सव उत्साहात संपन्न.
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालय च्या वतीने घेण्यात आलेला सुरताल संगीत महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व विद्यार्थांच्या श्लोक पठणाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रश्मी (दिदी) बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, यश कल्याणीचे अध्यक्ष गणेश करे पाटील, डॉक्टर अमोल घाडगे, मिलिंद फंड ,बाळासाहेब गोरे व नगरसेवक महादेव अण्णा फंड उपस्थित होते.
कार्यक्रमात कोलकत्ता येथील कथक नृत्यांगना अभिप्सा नंदी व सौमिली घोष यांनी शिववंदना, गणेश वंदना, तिनताल, तेवराताल, ठुमरी, माखनचोरी, मिरा भजनचे दर्जेदार सादरीकरण केले. पुणे येथील कथक नृत्यांगना कांचन पालकर यांनी देवीस्तुती, सरगम, झपताल, भजन, तराणा चे सादरीकरण केले. विजया कांबळे यांनी सरोद वादन केले. त्यांना तबला साथ संगत प्रकाश शिंदे यांनी केले. विद्यालयातील विद्यार्थींनी गगन सदन, पोटापुरता पसा पाहिजे, जाऊ देरे मला, आदी गितांचे सादरीकरण केले. यावेळी रश्मी बागल, गणेश करे पाटील, बाळासाहेब गोरे, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांच्या भैरवी रागाने करण्यात आली. त्यांना तबला साथ नाना पठाडे व प्रकाश शिंदे यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब नरारे, सूत्रसंचालन दतात्रय जाधव व निलेश कुलकर्णी तर आभार दिगंबर पवार यांनी मानले.
