Thursday, April 17, 2025
Latest:
सकारात्मक

पोलिस भरती प्रक्रियेस १५ डिसेंबर पर्यंत मिळालेल्या मुदतवाढीचा तरुणांनी फायदा घ्यावा- आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी पोलिस भरती ची प्रक्रिया गृह विभागामार्फत राबविण्यात येत असुन,३०/११/२०२२ ऐवजी मुदतवाढ देऊन आता दिनांक-१५/१२/२०२२ पर्यंत अर्ज सादर करता येईल. आपल्या करमाळा आणि माढा तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी भरती प्रक्रीयेसाठी सहभागी व्हावे आणि मुदतवाढीचा देखिल फायदा उठवावा. असे आवाहान आमदार. संजयमामा शिंदे यांनी नवयुवकांना केले आहे. ऑनलाइन अर्ज भरताना भरती ऊमेदवारांना अनेक अडचणी येत होत्या त्यामुळे गृह विभागाने अर्ज भरणेस मुदतवाढ दिली असुन, याचा सर्व युवक मंडळीनी फायदा घेणे गरजेचे असलेचे मत त्यांनी मांडले. मतदारसंघातील युवकांसाठी आजपर्यंत गावोगावी जिम साहित्य आणि जिम इमारत बांधकामासाठी निधी वितरीत केला असुन, आगामी काळातही यासाठी मागणीप्रमाणे निधी देण्याचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. करमाळा येथे टेबल टेनिस करिता प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला असुन, आपल्या ग्रामिण भागातील मुले देश- विदेशात स्पोर्टस मधे चमकावित असे वाटते.. अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group