Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडीसकारात्मकसामाजिक

करमाळा तालुक्यातील घारगावचे सुपुत्र श्री संजय सरवदे यांना सामाजिक कार्याबद्दल शेतकरी पुत्र फाउंडेशन अहमदनगर महाराष्ट्र यांचेकडून नॅशनल ग्रेट अचीवर्स अवार्ड 2022 या पुरस्काराने सन्मानित*

करमाळा प्रतिनिधी
शेतकरी पुत्र फाउंडेशनने यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा नगर येथे रेडियन्स हॉटेलमध्ये आयोजित केला होता. या सोहळ्यामध्ये कृषी, उद्योजक, शैक्षणिक, सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांना नॅशनल ग्रेट अचिवर्स अवॉर्ड 2022 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आपण ही गेल्या अनेक वर्षभरापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. आपण केलेले कार्य हे आम्हाला प्रेरणा व ऊर्जा देणारे आहे.आपण आपल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी शेतकरी पुत्र फाउंडेशन आयोजित नॅशनल ग्रेट अचिवर्स अवॉर्ड 2022 आपणास हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या पद्यश्री मा. सौ राहीबाई पोपरे (बीजमाता) ,पद्मश्री पुरस्कार विजेते मा.पोपटराव पवार (आदर्श सरपंच) हिवरे बाजार, मा. श्री कैलास राऊत मा. श्री किशोर भणगे अध्यक्ष युवा काँग्रेस नेवासा यांच्या हस्ते शाल श्रीफळ ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी शेतकरी पुत्र फाउंडेशन अहमदनगर महाराष्ट्र संस्थापक, अध्यक्ष अनिकेत अशोक शेळके, उपाध्यक्ष, कृष्णा पाठक, सचिव रोहन ढेरे ,सहसचिव सौरभ निकम, सल्लागार ऋषिकेश पाठक, खजिनदार शुभम सुद्रिक, घारगाव च्या ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी संजय सरवदे अनेक पुरस्कारथी शेतकरी बांधव व अनेक मान्यवर पाहुणे यावेळी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group