Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसामाजिक

कोंढार चिंचोली ते डिकसळ पुलावरील खड्डे बुजावण्याच्या कामास अखेर सुरवात- माजी सरपंच देविदास (आप्पा) साळुंखे                                               

करमाळा प्रतिनिधी कोंढारचिंचोली  ते डिकसळ या जुन्या ब्रिटिशकालीन रेल्वे पुला वरती पावसामुळे पाणी साचून खड्डे पडले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक त्रास सहन करावा लागत होता. त्यासाठी कोंढार चिंचोली चे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते मा. श्री देविदास आप्पा साळुंके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार करून त्याचा सतत पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाच्या रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजवण्याचे चांगल्या दर्जाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. याचे नागरिकात मधून समाधान व्यक्त होत आहे. त्यासाठी माजी सरपंच देविदास साळुंखे यांनी सार्वजनिक बांधकामचे श्री उबाळे साहेब. श्री वाघ साहेब, श्री ढेरे, श्री मोलावणे साहेब, श्री. सापते साहेब. तसेच करमाळा तालुक्यातील सर्व पत्रकार बंधुचे आभार व्यक्त केले आहे. व नागरिकां मधून समाधान व्यक्त होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group