शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर राजकीय द्वेषापोटी शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी ईडीचा विरोधकाकडुन गैरवापर- शाहुदादा फरतडे मा.तालुकाप्रमुख शिवसेना
करमाळा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर राजकीय द्वेषापोटी व शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी ईडी ला हाताशी धरून झालेल्या कारवाईचा शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा येथे निषेध करुन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना समर्थन देण्यात आले.यावेळी बोलतना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे म्हणाले कि ईडीचा धाक दाखवून आमदार फोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार करुन सुद्धा शिवसेनेला राज्यभरातून मिळत असलेल्या तुफान प्रतिसादा मुळे भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली असून आत्ता संजय राऊत यांना अटक करुन शिवसेनेचा व उद्धव ठाकरे यांचा आवाज दाबण्याचे काम करत आहेत. मात्र या बोगस कारवाईत ईडी च्या हाती काय लागलणार नसून संजय राऊत लवकरच ईडीवर विजय मिळवून पुन्हा सक्रिय होतील असा विश्वास व्यक्त केला.या वेळेस बच्चा बच्चा जानता है संजय राऊत सच्चा है! संजय राऊत तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ! आवाज कुणाचा शिवसेनेचा या घोषणांनी जिन मैदान परिसर गजबजून गेला होता.या वेळेस शिवसेना शाखाप्रमुख उत्तम हनपुडे, शिवसैनिक शिवाजीराव माने ,शहाजीराव धेंडे, कालिदास कदम, अभिमन्यू लोकरे, नितीन जगताप, संतोष वायकर, ए एस माळी आदी शिवसैनिक उपस्थित होते.
