Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासहकार

शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन वेळेत फेड करा -दिलिप तिजोरे सहाय्यक निंबधक

करमाळा: ताा. प्रतिनिधी
“संस्था गावची आहे म्हणून शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज परत फेड करावी व पुन्हा कर्ज घेऊन आपली प्रगती साधावी तसेच संस्थेचा विकास करावा”, असे आवाहन सहाय्यक  निबंधक  दिलीप तिजोरे यांनी केले.
  सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ग्राहक व शेतकरी यांच्या आयोजित मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी तालुक्याचे पालक अधिकारी जयंत पाटील, वरीष्ठ बॅक निरिक्षक अभयसिंह आवटे, शंकर रासकर आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी  तालुक्यातील शंभर टक्के वसूल झालेल्या संस्थां चेअरमन व सचिव यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.यावेळी  करमाळा तालुका सहाय्यक निबंधक  दिलीपराव तिजोरे यांचे हस्ते शंभर टक्के वसुली देणारे संस्थेचे सचिव व अध्यक्ष चा सन्मान करण्यात आला .
यावेळी महाराष्ट्र राज्याचे अप्पर आयुक्त व जिल्हा बॅकेचे कुशल प्रशासक शैलेषजी कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बॅकेचा कारभार प्रगतीपथावर आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती  बँक शेतकऱ्यांना, व्यवसायिकांना, नोकरदारांना कर्ज देण्यास समर्थ आहे. यावेळी बॅक देत असलेल्या योजनेचा शेतक-यानी लाभ घ्यावा असे आवाहन तालुक्याचे पालक अधिकारी जयंत पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी वांगीचे संस्थेचे  चेअरमन श्री.रोकडे यांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज देण्याची विनंती केली असुन वरीष्ठ पातळीवर तात्काळ तजवीज करण्याची मागणी केली .सदर कार्यक्रमास वरीष्ठ बॅक निरिक्षक अभयसिंह आवटे, उमरड  सोसायटीचे चेअरमन श्री.बदे, शहाजी ठोसर,  अशोक नरसाळे, सचिव दत्ता शिर्के , श्री. जागते भाऊसाहेब , बाळासाहेब रेगुडे, आसिफ पठाण , असलम शेख, हरिश्चंद्र कानगुडे , सपकाळ  आदि विविध  गावच्या सोसायटीचे चेअरमन, सचिव, बँक अधिकारी  शेतकरी, ग्राहक उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन बॅक अधिकारी शंकर रासकर, जाधव व शाखेतील कर्मचाऱ्यांनी केले होते. आभार शंकर रासकर यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group