Thursday, April 24, 2025
Latest:
करमाळा

कुकडी प्रकल्प.पोंधवडी चारीवरून शितोळे उपचारीचे काम सुरू

करमाळा प्रतिनिधी
आ. संजयमामा शिंदे यांच्या महत्प्रयासाने गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले पोंधवडी चारीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्याने हुलगेवाडी शिवारातून शितोळे वस्तीकडे जाणाऱ्या अपूर्ण चारीच्या कामाचा शुभारंभ दि.8 जुन रोजी करण्यात आला. या चारी ची लांबी 440 मीटर असून त्यासाठी सव्वा मीटर व्यासाच्या सिमेंट पाईप वापरण्यात येणार आहे. या चारीचा लाभ हुलगेवाडीतील शेतकऱ्यांना होणार आहे.
कुकडी प्रकल्प डावा कालवा अंतर्गत पोंधवडी चारीचे काम निधीअभावी 2009 पासून रखडलेले होते. सदर चारीच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून विहाळ, कोर्टी ,गोरेवाडी ,हुलगेवाडी ,कुस्करवाडी राजुरी, वीट, अंजनडोह या गावातील नागरिक सातत्याने लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत होते.कॅनॉलचे कामे रखडल्यामुळे कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये कुकडीचे पाणी दाखल झालेले नव्हते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यांनी कुकडी प्रकल्प अंतर्गत येणारी पोंधवडी या चारीचे काम पूर्ण करून या चारीवरील गावांना आपण पाणी देऊ असे वचन दिले होते. या वचनाची पूर्ती 2023 मध्ये आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडून झाली . पोंधवडी चारीसाठी 9 कोटी रुपयांचा भरीव निधी प्राप्त झाल्यामुळे या चारीवरील सर्व कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शितोळे चारीच्या शुभारंभ प्रसंगी निलकंठ तात्या अभंग, देविदास शिवाजी हुलगे, सुभाष आबा अभंग, रुपचंद गावडे, निवृत्ती माने साहेब, पोंधवडी चे सरपंच मनोज कोंडलिंगे, कंपनीचे म्यानेंजर दळवी, छगन हुलगे, रघुनाथ वाघमारे, सुनील जाधव, जालिंदर वाघमारे, कारभारी कवचाळे, राजेश येळे, शिवाजी मासाळ, मालोजी पाटील, ऋषिकेश हुलगे, गणेश कवचाळे, सुरेश कवचाळे, संतोष जाधव, सुशांत काळें, प्रदिप हुलगे, नितीन सोलंकर , सचिन वाघमारे, मच्छिंद्र साळवे, मोरवड चे नाळे आणि हुलगेवाडी व शितोळे वस्तीवरील ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group