आध्यात्मिककरमाळा

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गणेश नगर करमाळा (दिंडोरी प्रणित)अन्तर्गत अखंड नाम गुरूचरित्र पारायण सप्ताह

करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ व अष्ठपिठाचे पिठाधीष श्री अन्नासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व आदरणीय चंद्रकांत दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी २०२४ निमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गणेश नगर करमाळा (दिंडोरी प्रणित)अन्तर्गत अखंड नाम जप यज्ञ सप्ताह दिनांक ३० एप्रिल २०२४ ते ६ मे २०२४ या कालावधीत नवीन रयत भवन, कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजी मंडई आवार, नगर रोड करमाळा येथे संपन्न होणार आहे. या सप्ताहात सकाळी ८.३० ते १०. ३० या वेळेत सामुदायिक गुरूचरित्र पारायण होणार आहे. सप्ताह कालावधीत प्रहर सेवा संपन्न होणार असून यामध्ये सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत महिला व रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत पुरुष सहभाग घेऊ शकतात. प्रहर सेवा म्हणजे दोन सेवेकरी विना वादन, दोन सेवेकरी स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पठण व दोन सेवेकरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुळशीच्या माळेवर जप ही सेवा एका सेकंदाचा ही खंड न पडू देता पुर्ण सप्ताह कालावधीत करत असतात. प्रहर सेवेत सहभागी होणाऱ्या भाविकांचे अनेक स्वरुपाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात. त्यानंतर सप्ताह कालावधीत रोज हवनयुक्त गणेश याग, स्वामी याग, चंडी याग, रुद्र याग, मल्हारी याग, गिताई याग यांसारखे वेगळे वेगळे याग सेवा संपन्न होणार आहेत. जास्तीत जास्त भाविक नागरिकांनी या सेवेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गणेश नगर करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!