करमाळा

बारामतीच्या प्रसिद्ध सौंदर्य तज्ञ मेकअप आर्टिस्ट पूजा देशमुख यांच्या ऑरेंज मेकअप अँड ब्युटी स्कूलला राष्ट्रीय नामांकित असोसिएशन ऑफ ब्युटी थेरेपी अँड कॉस्मेटोलॉजी (ABTC) या संघटनेचे अधिकृत परीक्षा केंद्र म्हणून मान्यता

बारामती प्रतिनिधी:
बारामतीच्या प्रसिद्ध सौंदर्य तज्ञ पूजा देशमुख यांच्या मेकअप अँड ब्युटी स्कुलला ए बी टी सी मुंबईकडून अधिकृत परिक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. ए बी टी सी मुंबई यांचेकडून सौ. नम्रता गौड, ए बी टी सी संकुल ॲण्ड एज्युकेशन इन्चार्ज यांनी सदर बाबत दि. १६ एप्रिल २०२४ रोजी तपासणी अधिकारी म्हणून भेट दिली होती. ए बी टी सी ही ब्युटी आणि मेकअप क्षेत्रातील नामांकित संघटना आहे.
या संघटनेतर्फे ऑरेंज स्किल फाउंडेशन संचलित ऑरेंज मेकअप अँड ब्युटी स्कूलला आजीवन सदस्यत्व देण्यात आले आहे. सौंदर्य क्षेत्रातील नामांकित संघटना असलेल्या या संघटनेमार्फत ए बी टी सी ब्युटी थेरेपिस्ट (Beauty Therapist) आणि ए बी टी सी मेकअप आर्टिस्ट (Makeup Artist) अशा दोन प्रशिक्षण कोर्सला मान्यता मिळाली आहे असे ऑरेंज स्किल फाउंडेशनच्या संस्थापिका सचिव पूजा देशमुख यांनी माहिती दिली आहे. सदर कोर्सेसची पहिली बॅच ११ मे २०२४ पासून सुरू होणार असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.
ए बी टी सी ही भारत देशातील सौंदर्य प्रसाधन क्षेत्रामध्ये काम करणारी एक मोठी संघटना असून बारामती सारख्या ठिकाणी ‌सौंदर्यक्षेत्रात काम करणाऱ्या युवती, महिला भगिनींसाठी या कोर्सेसच्या माध्यमातून रोजगार व व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
बारामती व पंचक्रोशीतील हे प्रथम एकमेव मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्र आहे. ABTC मुंबई मान्यताप्राप्त ऑरेंज ब्युटी अँड मेकअप आर्टिस्ट स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर देशभरातील नामांकित ब्रँडच्या व सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील कंपनीसोबत काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे. प्रशिक्षणामध्ये ब्युटी अँड मेकअप क्षेत्रातील अगदी छोट्या मोठ्या गोष्टीचे आकलन होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बारामती व पंचक्रोशीतील महिलांसाठी ही मोठी आनंदाची बाब असून सौंदर्य हा स्त्रीचा दागिना असून ते जपण्यासाठी ‌व खुलविण्यासाठी ज्ञानाची गरज आहे व तेच ज्ञान आत्मसात करण्यासाठी बारामती येथील ऑरेंज मेकअप अँड ब्युटी स्कूलने‌ या क्षेत्रात काम करण्यासाठी मोठी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. तरी या प्रशिक्षण केंद्रातील या कोर्सला प्रवेश घेऊन याचा सर्व महिला, युवती, गृहिणींनी लाभ घ्यावा असे आवाहन पूजा देशमुख यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पूजा देशमुख – ९९७५५७१५१८ यांना संपर्क साधावा.

error: Don\'t try to copy. Content is protected !!