करमाळाताज्या घडामोडी

नॅशनल बांबू मिशनच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार संजयमामा शिंदे यांची बैठक.

करमाळा प्रतिनिधी
नॅशनल बांबू मिशनचे सोलापूर व पुणे जिल्ह्याचे समन्वयक श्री विनय कोलते यांनी करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे , माजी आ. जयवंतराव जगताप यांच्यासोबत तालुक्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला .ही भेट सेवानिवृत्त कृषी अधिकारी निळकंठ अभंग व सुजित बागल यांनी विशेष प्रयत्नाने घडवून आणली.
याप्रसंगी विनय कोलते यांनी सोलापूर जिल्ह्यातील हवामानामध्ये बांबूच्या कोणत्या जाती येऊ शकतात याविषयी मार्गदर्शन केले. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीमध्ये उत्साह दाखविला तर त्यासाठी केंद्र शासनाची अटल बांबू योजना तसेच नॅशनल बांबू मिशन या माध्यमातून सहकार्य होऊ शकते असे मत मांडले .भविष्यात बांबू पीक लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ झाली तर त्यापासून बायोडिझेल, इथेनॉल, सीएनजी, अगरबत्ती काडी, चारकोल , कापड निर्मिती व कागद निर्मिती सारखे उद्योग उभारले जाऊन शेतकऱ्यांच्या जीवनात उन्नती येऊ शकते व देशाचे परकीय चलनही वाढू शकते असे प्रतिपादन केले .
यावेळी आ. संजयमामा शिंदे यांनी नागपूर येथील बांबू विषयातील तज्ञ व्यक्तींशी भ्रमण ध्वनीद्वारे चर्चा केली .भविष्यात कोणता उद्योग करमाळा तालुक्यासाठी व्यवहार्य होईल याबाबत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे श्री कोलते यांना सूचित केले .
याप्रसंगी माजी आमदार जयवंतराव जगताप ,माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव दादा माळी, सुजित तात्या बागल ,निळकंठ अभंग , प्रवीण शिंदे , सुनील शिंदे , पप्पू घाडगे संतोष मस्तूद, पप्पू उकिरडे, ऋषिकेश बागल यांच्यासह बांबू उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group