रमजान महिन्यात पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मुस्लिम बांधवांची मागणी
करमाळा प्रतिनिधी मुस्लिम समाजाचा पवित्र असा ” रमजान महिना ” सुरू 24 मार्चपासून सुरू असून या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव आणि भगिनींना उपवास ( रोजा ) असतात. या काळात अन्य धर्मीय यांचे सुद्धा सणवार असुन त्यांना दैनंदिनी कामासाठी भरपूर प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते.उन्हाळा महिना सुरू असुन उन्हाळ्यात शहरातील सर्व नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही याची दखल ही नगरपालिका प्रशासनाने घेऊन योग्य अशी उपाययोजना करुन होणारे त्रासापासून नागरिकांनाची सुटका करावी . काही कारणास्तव पाणी पुरवठा खंडीत होत असेल तर नागरिकांना पुर्व सुचना देऊन टॅंकर द्वारे पाणी पुरवठा सुरू करावा.तसेच वीज वितरण विभागाने रमजान महिन्यात भारनियमन रद्द करुन विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवावा अशी मागणी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा व करमाळा मुस्लिम समाज यांच्या तर्फे नगरपालिका प्रशासन व वीज वितरण विभाग यांना करत आहे.
