Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

चिमुकल्यानी नृत्य सादर करुन जिंकले मन किंडरजॉय सी.एस.सी. बालविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी किंडरजॉय सी.एस.सी. बालविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला झाला.
दि. १४/०२/२०२४ रोजी किंडरजॉय सी.एस.सी. बालविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन अथर्व मंगल कार्यालय श्रीदेवीचामाळ येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री. गणेश (भाऊ) करे-पाटील होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अंजली श्रीवास्तव (लेखिका), श्री. विशाल शिंपी ( सी.एस.सी. करमाळा तालुका समन्वयक), श्री. परदेशी (पत्रकार), श्री. राजेश गायकवाड (पत्रकार),श्री. दिनेश मडके (पत्रकार), डॉ. शेलार हे होते. अध्यक्षीय भाषणातून श्री. गणेश (भाऊ) करे-पाटील यांनी शाळेचे कौतुक करून शाळेसाठी एक एल. सी. डी. टेलीव्हिजन सेट सप्रेम भेट दिला. तसेच त्यांनी संस्थेच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले. कमलाई शैक्षणिक व बहुद्दीशीय संस्थचे अध्यक्ष श्री. धनराज कांबळे यांनी प्रस्तावना करून पाहुण्यांचा सत्कार केला. सर्व पाहुण्यांनी लहान मुलांच्या कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेतला. या कार्यक्रमाला पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमध्ये लहान मुलांनी आपल्यातील सर्वांगीण कालागुणांचे उत्कृष्ठ प्रदर्शन केले. कार्यक्रमामध्ये सर्व धर्म, बंधुभाव, आई वडिलांविषयीचा आदरभाव, प्रेम, संस्कृती या थीमवर गाणे सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . नंदकुमार वलटे यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी कोरिओग्राफर म्हणून सिद्धी कदम यांनी उत्तम रित्या कार्य केले. किंडरजॉय सी.एस.सी. बालविद्यालयाच्या संचालिका सौ. राजश्री कांबळे यांच्या मार्गदर्शखाली कार्यक्रम यस्वीरित्या पार पाडण्यासाठी सौ .मीनाक्षी ढाळे, सौ . सुप्रिया जोगदंड,सौ . सीमा खराडे,सौ .राबिया बागवान,सौ .अर्चना जाधव,सौ वंदना काळे यांनी अखंड परिश्रम घेतले

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group