परिवर्तन प्रतिष्ठान राजुरी, साईदीप हॉस्पिटल अहमदनगर व करमाळा मेडिकोज गिल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने कोर्टी येथे मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन-डाॅ.अमोल दुरंदे
करमाळा प्रतिनिधी परिवर्तन प्रतिष्ठान राजुरी, साईदीप हॉस्पिटल अहमदनगर व करमाळा मेडिकोज गिल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने राजेश्वर हॉस्पिटलच्या नुतनीकरण उद्घाटनानिमित्त शुक्रवार दि.२३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते दु ३ वाजेपर्यंत डॉ. दुरंदे गुरुकुल, कोर्टी या प्रशालेच्या प्रांगणामध्ये मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती राजुरी चे माजी सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे यांनी दिली आहे. या शिबिराचे उद्घाटन करमाळा तालुक्याचे आमदार मा.श्री. संजयमामा शिंदे व कर्जत – जामखेडचे आमदार मा.श्री. रोहितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.परिवर्तन प्रतिष्ठान ही संस्था गेले दहा वर्षापासून सर्वसामान्य व्यक्तींना केंद्रबिंदू मानून प्रत्येक वर्षी मोफत आरोग्य शिबीराचे नियोजन करत असते, यावर्षीचे सुपर स्पेशलिटी शिबीर असल्यामुळे त्याकरिता अहमदनगर येथील प्रसिद्ध सुपर स्पेशालिस्ट व प्रत्येक आजारावर तज्ञ असलेले डॉक्टर्स यामध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉ.किरण दिपक, डॉ.श्रीधर बधे, डॉ.गणेश मैड, न्युरो सर्जन डॉ.भुषण खर्चे, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. वैशाली किरण यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये हृदयरोग, मेंदू-मणका विकार, अस्थिविकार, बालरोग,कॅन्सर, मधुमेह, नेत्रविकार, त्वचारोग ,स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र व वंध्यत्व निवारण,आयुर्वेद, होमिओपॅथीक तज्ञांकडून मोफत तपासणी, सल्ला व उपचार केले जाणार आहेत.तसेच या शिबिरामध्ये हिमोग्लोबिन, शुगर, रक्तदाब,इसीजी,अॕंजिओग्राफी इ. तपासणी मोफत होणार आहे. शिबिरामध्ये दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र काढण्यासाठी मार्गदर्शन, आयुष्यमान कार्ड काढून देण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तालुक्यातील गोर-गरीब व्यक्तींना तसेच पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जाणार आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचा हा छोटासा प्रयत्न या संस्थेच्या वतीने करीत आहोत तरी जास्तीत जास्त गरजू पेशंटने या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा शिबीराचे मुख्य संयोजक डॉ. अमोल दुरंदे व डॉ. विद्या दुरंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
